मंगळवार, २८ मे, २०१९

घडावा संघाचा संस्कार...५

नवीन नवीन सहकार्यवाह झाल्यानंतर काही जुन्यांना संपर्कात आणून परत दैनंदिन कामाच्या प्रवाहित आणण्याची खूमखूमी असते (अशी खूमखूमी असणं चूक आहे असं माझं म्हणणं नाही) तशी ती मलाही होती. अशाच एका जून्या प्रचारक म्हणून थांबलेल्या कार्यकर्त्यांना मी ठरवून पण सहजच भेटणार होतो. मी घर शोधत गेलो, मनात काय आलं माहीत नाही. खूप मनापासून घरी जावं वाटत नव्हतं. जावं का नाही असा विचार करत असतांनाच सचिनजींचा फोन आला काहीतरी कामासाठी. कामाचं बोलणं झाल्यावर त्यांना सांगितलं की ह्या अमूक कार्यकर्त्याच्या घराबाहेर उभा आहे आणि संभ्रमात आहे जावं की नाही, काय करू? ते म्हणाले "जाऊ नकोस, संभ्रम असेल तर जाऊ नकोस, अशा जाण्याचा काही उपयोग होत नाही". त्यांच्या बोलण्याने माझा संभ्रमच दूर झाला. मी लगेच भेटायला गेलो. आपण उपचार म्हणून काही गोष्टी करतो त्याचा योग्य तो परिणाम होत नाही, मनापासून केलं तरच त्याचा योग्य तो परिणाम होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा